Sakal (13).jpg 
अर्थविश्व

भारतीय अर्थव्यवस्था 9.6 टक्क्यांनी घसरणार; वर्ल्ड बँकेने प्रसिद्ध केला अहवाल 

सकाळ ऑनलाईन टीम

वर्ल्ड बँकेने 2020-21 चालू आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्था 9.6 टक्क्यांनी घसरणार असल्याची शक्यता वर्तविली आहे. तर पुढील आर्थिक वर्षात 2021-22 मध्ये भारतीय अर्थव्यवस्था पुन्हा सावरून 5.4 टक्क्यांनी वाढ नोंदविणार असल्याचा अंदाज वर्ल्ड बँकेने व्यक्त केला आहे. जागतिक आर्थिक प्रॉस्पेक्टच्या अहवालात जागतिक बँकेने कोरोना विषाणूच्या साथीमुळे असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्यांवर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला असल्याचे नमूद केले आहे. कोरोनाच्या संकटामुळे असंघटित क्षेत्रातील काम करणाऱ्या लोकांच्या उत्पन्नावर खूप मोठा परिणाम झाल्याचे वर्ल्ड बँकेने म्हटले आहे. तसेच वर्ल्ड बँकेने या  अहवालातून कौटुंबिक स्तरावरील खर्च आणि खासगी गुंतवणूकीतील घट झाल्याचे दर्शविले आहे. 

वर्ल्ड बँकेने जाहीर केलेल्या या अहवालात भारतीय अर्थव्यवस्था अगोदरच आक्रसत असताना नेमके याच वेळी कोरोना साथीच्या रोगाने घाव घातल्याचे म्हटले आहे. व  2020-21 च्या वित्तीय वर्षातील उत्पादनातही 9.6 टक्क्यांची घट दिसून येण्याची शक्यता असल्याचे वर्ल्ड बँकेने या अहवालात म्हटले आहे. तसेच याचा कौटुंबिक उत्पन्न आणि खाजगी गुंतवणूकीत प्रभाव दिसत असल्याचे वर्ल्ड बँकेने अधोरेखित केले असून, मात्र आगामी आर्थिक वर्षात भारताचा आर्थिक विकास दर सुधारण्याचा अंदाज  वर्ल्ड बँकेने व्यक्त केला आहे. आणि हा विकास दार 5.4 टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता असल्याचे अहवालात सांगितले आहे. त्यामुळे कोरोनाची साथ येण्यापूर्वीच भारतीय अर्थव्यवस्थेला घरघर लागल्याचे वर्ल्ड बँकेच्या या अहवालाने शिक्कामोर्तब होत आहे. 

याव्यतिरिक्त, असंघटित क्षेत्रातील रोजगाराचे प्रमाण 80 टक्के असून, कोरोना साथीच्या महामारीमुळे या घटकात मोडणाऱ्यांच्या उत्पन्नात घट होऊन सर्वात मोठे नुकसान झाल्याचे अहवाल वर्ल्ड बँकेने स्पष्ट केले आहे. अनेकांचा व्यवसाय ठप्प झाला असून, कोरोनाच्या अटकावासाठी लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीचा अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम झाला असल्याचे वर्ल्ड बँकेने म्हटले आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Health Schemes: महात्मा फुले व पंतप्रधान जन आरोग्य योजनेंतर्गत हृदय व कर्करोग उपचारांसाठी रुबी हॉल क्लिनिकशी राज्य सरकारचा करार

Marathi News Live Updates : राज्यात होणार डॉक्टरांची मेगाभरती, आरोग्यमंत्र्यांची मोठी घोषणा

Pimpri-Chinchwad Youth Rally: पिंपरी-चिंचवडमध्ये स्वातंत्र्यदिनी युवाशक्तीचा जागर; ‘ओळख स्वतःची, जिद्द यशाची’च्या घोषणांनी १० लाईटहाऊस केंद्रांत जनजागृती रॅली

Tarique Rahman: तारिक रहमान भारत दौऱ्यावर येतील पण...; बांगलादेशने ठेवली फक्त एकच अट, पण कोणती? समीकरण बिघडणार

High Court Clerk Typing Test Chaos: कल्याण एपीएमसी परीक्षा केंद्रातील गोंधळामुळे हायकोर्ट लिपिक टायपिंग टेस्ट कोलमडली; २५०हून अधिक विद्यार्थ्यांचा ठिय्या

SCROLL FOR NEXT